
तिरोडा,दि.26ः- येथील स्थित गजानन महाराज मंदिर सभागृह स्टेशन रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका तिरोड़ा कार्यकर्ता बैठकीचे आयोजन खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणीची सुरूवात व नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी खासदार पटेल म्हणाले की, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील तिरोडा तालुक्यातील निकाल धक्कादायक आले.निवडणुकीत झालेल्या काही चुकांपासुन बोध घेत भविष्यात यश कशाप्रकारे मिळेल याकरीता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.तसेच पक्षात क्रियाशील सभासदांची नोंदणी करून पक्ष संगठन मजबूत करावे.पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन केले. कार्यक्रम प्रसंगी सर्वश्री माज़ी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, माजी खासदार डाॅ. खुशाल बोपचे, योगेंद्र भगत, प्रेमकुमार रहांगडाले, अजय गौर, अविनाश जायस्वाल, नरेश कुंभारे, कैलास पटले, सुनीता मडावी, नीता रहांगडाले, केतन तुरकर, जगदिश बावनथडे, किरण पारधी,डॉ.संदीप मेश्राम, रिताताई पटले, जितेंद्र चौधरी, विजय बिंझाडे, वाय टी कटरे, जिब्राइल पठाण, आनंद बैस, किरण बन्सोड, रामू धामेचा, भोजराज धामेचा, अनिल धामेचा, सुनील धामेचा, सुरेश ग्यानचंदानी, अजय धामेचा, प्रकाश ग्यानचंदानी, राजेश धामेचा,निखिल धामेचा, श्यामजी बचवणी, सलीम जव्हेरी, मुकेश बेलानी, संजय मोटवानी,राजा पुरुलानी, अजय मेहरचंदानी, राजू वत्यांनी, श्रीचंद सुररानी, राजेश गुनेरिया, विशेष चुंगाणी,विजय धामेचा, विनोद वत्यांनी, रामकुमार असाटी, वासिम शेख, भुपेंद्र पटले, नितेश खोब्रागडे, जया धावडे, सविता पटले, चित्ररेखा चौधरी, राजेश तुरकर, राजु ठाकरे, चंद्रशेखर मडावी, सोनू पारधी, अनिल भगत, आशु पटले, महेश कुकडे, दिलीप कावळे, ओमप्रकाश आंबुले, रोहित पटले, जितेंद्र पारधी, विनोद कुकडे, बालाराम साठवणे, अल्केश मिश्रा, अजय बारापात्रे, दुर्गेश कळपाते, मुकेश पटले, छोटु बिसेन, मोरेश्वर ठाकरे, राधेश्याम नागपुरे, बोधानंद गुरुजी, ठामसिंग हरिणखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित होते.
शहर तिरोडा येथे भालचंद्र धामेचा यांच्या निवासस्थानी खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यां सोबत विविध समस्यांवर व आगामी तिरोडा नगर परिषद निवडणुकीच्या संबंधाने सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तिरोडा शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.





