
साकोली-येथील राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांना निवेदन देवून केली आहे.
साकोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर उड्डाणपुलाचे काम परिपूर्ण होत आहे. परंतु, साकोली येथील नागझिरा रोड चौकाच्या दोन्ही बाजूला शाळा, महाविद्यालय आहेत. त्यात नवजीवन विद्यालय बीएड, डीएड, के जी टू पी जी तसेच दुसर्या बाजूला एम. बी. पटेल महाविद्यालय, तालुका क्रीडा संकुल व शाळा आहे याकरिता सध्या शाळा-महाविद्यालय सुरू झालेले आहे.अशा परिस्थितीत लहान मोठ्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी कमालीच्या त्रास सहन करावा लागतो. सध्या दोन्ही बाजूची ट्राफिक खालून सुरू असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाकर सपाटे महासचिव डॉ.अनिल शेंडे उपाध्यक्ष, सुरेश बोरकर सेंदुरवाफा नगर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पोलिस स्टेशन साकोलीचे पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांना निवेदन देऊन या चौकात सकाळी १0 ते ११ व संध्या. ४ ते ५ वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली.





