
गोंदिया,दि.2ः- जिल्ह्यातील देवरी पंचायत समिति चे खंड विकास अधिकारी चंद्रमणि मोडक हे आज दुपारी दोनच्या दरम्यान लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले आहेत.
विस्तृत माहिती अशी की बिल पास करून देण्याच्या ऐवजी तक्रारदाराकडून खंड विकास अधिकाऱ्यांनी एक लाख रुपये इतकी लाच मागितली होती त्यातील तीस हजार रुपए पूर्वीच देण्यात आले होते व उरलेले सत्तर हजार रुपये देने भागपडत नव्हते म्हणून तक्रारदारने लाचलूचपत विभागाकडे धाव घेतली सत्तर हजार रुपए मधून पाच हजार रुपये सूट स्वरुपात कमी करण्यात आले होते व उरलेली 65000/-रुपये आज बुधवार दि.०२/०३/२२रोजी देण्याचे ठरले अस्ता लाचलूचपत विभागाकडून सापडा रचुन तक्रारदाराकडून ही रक्कम खंड विकास अधिकारी यांना देण्यात आली रक्कम देतेवेळी लाचलूचपत विभागाचे कर्मचार्यांनी त्या अधिकारी ला रंगेहाथ पकड़ले,पुढील कारवाई एस. पी.लाचलूचपत विभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली ए. पी.आय.अहिरकर व त्यांची चमु हे करीत आहे.





