30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जागतिक महिला दिनानिमित्त राजमुद्रा ग्रुप तर्फे महिलांचा सन्मान*

जागतिक महिला दिनानिमित्त राजमुद्रा ग्रुप तर्फे महिलांचा सन्मान*

0
48

blank

तुमसर: दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतात. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते. प्रत्येक ‘ती’चं आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचे-खास आहे, ‘ती’नं केलेल्या प्रत्येक कार्याचा आम्हाला आदर आहे; अशा बऱ्याच गोष्टींची जाणीव ‘ती’चा सन्मान करून दिली जाते. तसेच तुमसर येथे जागतिक महिला दिना निमित्त कल्याणीताई भुरे स्थापित उडान या संस्थेद्वारे मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती त्यात भरपूर महिलांनी भाग घेऊन सिद्ध करून दाखवले की महिला कुठेही पुरुषांपेक्षा मागे नाहीत या कार्यक्रमात राजमुद्रा ग्रुप तुमसर तर्फे प्रथम, दृतीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या महिलांना  छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.
   यावेळी राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी सांगितले की आपल्या राजकीय, धार्मिक विरोधकांच्या महिलांचादेखील आदर, सन्मान, संरक्षण करणे हेच खरे शिवकार्य आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, त्यांना संधी देणे हे शिवकार्य आहे. राजकीय लढा चालूच राहील; पण त्या राजकीय लढ्यातदेखील विरोधी बाजूच्या महिलांचा सन्मान करणे, ही खरी शिवभक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक जीवघेणे प्रसंग आले. पण त्यांनी नैतिकता कधीही सोडली नाही. औरंगजेब, दिलेरखान, शाहिस्तेखान, अफजलखानाबरोबर संघर्ष केला. पण त्यांच्याही महिलांचा शिवाजीराजांनी आदर केला. महिलांचा आदर करण्याची प्रेरणा राजमुद्रा ग्रुप नेहमीच देत राहील. या प्रसंगी राजमुद्रा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष इंजी. सागर गभने, उपाध्यक्ष सागर भुरे, सचिव योगेश आजापुजे, सहसचिव अनुप तिडके, कोषाध्यक्ष शुभम बाणासुरे, राहुल रणदिवे, हितेश मेहर, बापू बडवाईक, स्वपणील डुंबरे, अरपित खानोरकर उपस्थित होते.
blank
महीला मानव समाजाचा अविभाज्य अंग-सु.मो.भैसारे
अर्जुनी मोरगाव,दि.08ः- जि. प.वरीष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथे जागतिक महिला दिन समारोह महिला शिक्षिकेचा सत्कार करून संपन्न झाला.प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषण करताना , पदवीधर शिक्षक सु.मो.भैसारे म्हणाले की, सनातनाच्या पारंपरिक रूढी-परंपलेला छेद देत , जगातील महिला कामगार एकवटल्या व न्यायिक हक्कासाठी लढा दिला.स्त्रिया सुद्धा समाजाचा अविभाज्य अंग असून, त्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारे कमी लेखता कामा नये. महिलांनी सुद्धा पुरुषांप्रमाणे विविध क्षेत्रात केलेली मोलाची कामगिरी अतिशय व्याखण्यासारखी आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा समाजमनावर कोरून स्वतःला सिध्द करून दाखविले आहे. पुढे स्त्रिबद्दल गौरवोद्गार काढतांना म्हणाले की,
” कोमल हूं, कमजोर नही
शक्ति का रूप, नारी है
जग को जीवन, देनेवाली
मौत भी तुमसे, हारी है ।”
याप्रसंगी अचला कापगते-झोडे व प्राची कागणे-ठाकूर यां महिला शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र ठवकर तर सूत्रसंचालन पुरुषोत्तम गहाणे केले.कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी मोहन नाईक, वामन घरतकर, कसक शहारे, काजल रावेकर, काशीस वाघमारे, पूनम सोनवाने, वैष्णवी सोनवाने, लीना झोडे आदींनी केले.

blank