43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ स्व. ब्रीजलालजी कटरे हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले स्मृतीदिन व निरोप समारंभ उत्साहात

स्व. ब्रीजलालजी कटरे हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले स्मृतीदिन व निरोप समारंभ उत्साहात

0
34

blank

गोरेगाव,दि.10ःःतालुक्यातील स्व. ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी येथे सावित्रीबाई स्मृतीदिन व निरोप समारंभ कार्यक्रम सरपंच सचिन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील, तेजलाल पटले, शाळेचे मूख्याध्यापक आर. वाय.कटरे तसेच ए. वाय. टेंभरे,एस.एल.बडोले,ओ.बी.ठाकरे मॅडम व के. के. यादव उपस्थितत होते.याप्रसंगी सावीत्रीबाई फूले ,शारदा माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व ८वी, ९वी,१०वी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी बीजेवार हीने केले तर आभार हर्ष तूरकर यांनी केले. याप्रसंगी अध्यक्षांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व विद्यार्थींना ” जीवनात ध्येय ठरवा व ते गाठूनच यशस्वी व्हावे व निर्व्यसनी जीवनाचा अंगीकार करा “असे सांगितले. याप्रसंगी प्रमुख अतिथी तेजलाल पटले व मूख्याध्यापक आर. वाय.कटरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व महीलांचे योगदान व समाजातील स्थान , परीक्षा व त्याची तयारी यावर मार्गदर्शन केले सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व यांनी शाळेला भेटवस्तू प्रदान केली. आठवी, नववी च्या विद्यार्थ्यांनी व वर्ग शिक्षक यांनी दहावीच्या विद्यार्थीना पेन, व शैक्षणिक लेखन कीट भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

blank