31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home क्रीडा क्रीडा संकुलातील सोई-सुविधा अद्ययावत करा : जिल्हाधिकारी

क्रीडा संकुलातील सोई-सुविधा अद्ययावत करा : जिल्हाधिकारी

0
46

blank

• संकुल समितीची बैठक
• स्वच्छतेवर भर द्यावा
• नवी नियमावली मंजूर

गोंदिया,दि.10 : नागरिक व खेळाडूंसाठी क्रीडा संकुल अतिशय महत्त्वाचे असून गोंदिया शहरातील क्रीडा संकुल हे खेळाडू व नागरिकांसाठी हक्काचे ठिकाण आहे. गेल्या दोन वर्षांपासून क्रीडा घडामोडी ठप्प होत्या. आता क्रीडा विषयक बाबी सुरू होणार आहेत. त्यामुळे संकुलातील सोई-सुविधा अद्ययावत करण्यावर भर देण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल समिती नयना गुंडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.  जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश लभाने, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसर, उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण व जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड हे बैठकीला उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा संकुलातील सुविधा व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत आढावा घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून संकुल बंद असल्यामुळे संकुलाची स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. संकुल स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी क्रीडा विभागा सोबतच या ठिकाणी येणाऱ्या खेळाडू व नागरिकांची सुद्धा आहे असे त्यांनी नमूद केले. स्वच्छतेसोबतच संकुलाच्या शुशोभीकरणाची आवश्यकता आहे असे सांगून क्रीडा अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

कोरोनामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव बंद अवस्थेत होता. सदर तलावाची दुरुस्ती करून घेण्यात आली आहे असे घनश्याम राठोड यांनी सांगितले. क्रीडा संकुलातील सोई-सुविधांसाठी          1 एप्रिल 2022 पासून नवी नियमावली तयार करण्यात आली असून या नियमावलीला समितीने मान्यता प्रदान केली आहे. नवे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात येणार आहेत. या बैठकीत क्रीडा संकुलाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

blank