38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ एस.एस.जायस्वाल महाविद्यालयात वृक्षारोपण

एस.एस.जायस्वाल महाविद्यालयात वृक्षारोपण

0
20

blank

अर्जुनी मोरगाव(दिलीप कुरंजेकर)दि.11ः- येथील श्री दुर्गा शिक्षण संस्था द्वारा संचालित शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात अर्जुनी मोरगावच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने मियावाकी फॉरेस्ट ही अकिरा मियावाकी जपानी शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या संकल्पनेतून घनदाट जंगल तयार करण्याची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यात आली.यामध्ये महाविद्यालय परिसरातील अर्ध्या एकर जागेमध्ये एक फूट खोल एक फूट लांब आणि एक फूट रुंद या आकाराचे एक फूट अंतरावर 650 खड्डे तयार करण्यात आले.त्यामध्ये शेणखत कोंडा व माती यांचे मिश्रण करून खड्ड्यात टाकण्यात आले.
डॉ लक्ष्मीकांत बोरकर वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख यांनी अर्जुनी मोरगाव परिसरातील जंगलामध्ये असलेल्या स्थानिक वनस्पतीची पहाणी करून प्रत्यक्षात त्याच वनस्पती सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून घेतल्या.650 रोपटे सामाजिक वनीकरण कार्यालयांनी उपलब्ध करून दिले व त्यांचे वृक्षारोपण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात आले.यासाठी सामाजिक वनीकरण कार्यालय अर्जुनी मोर तसेच महाविद्यालय प्रशासन महाविद्यालयाचे माजी कार्य प्राचार्य डॉ अश्विन चंदेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईश्वर श्रावण मोहुर्ले आणि समिती सदस्य अजय राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

blank