37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक शिक्षक पतसंस्थेच्या कामकाजाची चौकशी करा -एस.यु.वंजारी

शिक्षक पतसंस्थेच्या कामकाजाची चौकशी करा -एस.यु.वंजारी

0
40

blank

गोंदिया,दि.12ः- गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत कार्यकाळ संपल्यानंतर मुदतवाढ मिळालेल्या संचालकमंडळाने 9 कोटी 59 लक्ष 88 हजार 323 रूपयाचा गैरव्यवहार केल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे संस्थेचेच संचालक एस.यु.वंजारी यानी केली आहे.तक्रारीत वंजारी यांनी संस्थेचा कार्यकाळा संपल्यानंतर केलेल्या खर्चावर आक्षेप घेतला अशून वाढिव कालावधीत अत्यावश्यक कामकाजाशिवाय इतर काहीही आर्थिक हित जोपासणारे काम करता येत नसल्याचे म्हटले आहे. संस्थेच्या निधिच्या सुरक्षिततेची काळजी न घेता सभासदांचे हितसंबंधास बाधा आणूण वारेमाप खर्च करून संस्थेचे आर्थिक नुकसान कार्यरत संचालक मंडळाने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संस्थेने संगणक सॉफ्टवेअर व्हर्चुअल गॅलक्सी इंफोटेक प्रा.लि. कडून घेतलेले असून त्यावर व संगणक देखभाल दुरूस्तीवर मोठ्याप्रमाणात खर्च केले असून संस्थेचे संचालक मंडळ नियमबाह्य निर्णय घेउन याच कंपनीला निविदा जाहिरात न काढता  काम देवून आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे.संस्थेने मोबाईल आप्लिकेशन,संगणक हैंडलींग, कॅम्प्युटर व प्रिंटर आदीमध्ये घोळ असल्याची तक्रार केली आहे.

blank