
**राजमुद्रा ग्रुप यांच्या प्रयत्नाला यश
तुमसर: येथील गांधी नगर मधील बुद्ध विहार समोरील श्रीमती शकुन डोंगरे ते लांजेवर आटाचक्की पर्यंतचा रस्ता बांधकामाचे काम मागील एक महिन्यापासून बंद होते.
संबंधित कंत्राटदारांनी रस्त्याच्या खोद कामाला सुरुवात केली होती. मात्र त्यांनी पुढचे काम सुरू न केल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावे लागायचे व रस्त्याचे काम बंद असल्यामुळे ये-जा करण्यास गैरसोय होत होती, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. याची दखल घेत राजमुद्रा ग्रुप संस्थापक अध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी तुमसर नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना दि: ०४-०३-२०२२ ला निवेदन दिले होते, त्यात नमुद केलं होतं जर सात दिवसाच्या आत कामाला सुरुवात झाली नाही तर राजमुद्रा ग्रुप मार्फत तीव्र आंदोलन कण्यात येइल व दिरंगाई न करता संबंधित विषयावर कंत्राटदार चेतन मेश्राम यांच्याशी संपर्क साधुन कामाची चौकशी केली व सदर विषयाची गंभीरता त्यांच्या लक्षात आणून दिली, त्यावर चेतन मेश्राम यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली व एक महिन्याच्या आत काम पूर्ण करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली. केलेल्या या प्रयत्नांचे गांधी नगरातील रहिवाशांनी इंजि. सागर गभने यांचे आभार मानले.





