41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home क्रीडा चक्क खासदार कबड्डीच्या मैदानात…

चक्क खासदार कबड्डीच्या मैदानात…

0
85

blank

भंडारा,दि.13ः Kabaddi खेळ अंगा अंगात भिनला असला की संधी मिळताच माणसातील खेळाडू डोकंवर काढतो. मग ती कुठल्याही पदावर का असो ना…
खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने हा अनुभव आला. कधीकाळी उत्कृष्ट कबड्डीचे खेळाडू असलेले खासदार सुनील मेंढे स्वतः मैदानात उतरले आणि प्रतिस्पर्धी संघाच्या तीन खेळाडुंना बाद करून वयाच्या 53 व्या वर्षी जोश कायम असल्याचे दाखवून दिले.


खासदार क्रीडा महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहेत. कबड्डीच्या सामान्यांनी चुरस निर्माण केली आहे. अशातच काल स्वतः खासदार सुनील मेंढे यांनी टी शर्ट आणि हाफ पॅन्ट असा खेळाडूचा पोषाख घालून मैदानात उतरत सर्वांना आश्चर्यचकित केले.भंडारा आणि गोंदिया संघात सुरू असलेल्या अत्यंत रोमांचक सामन्‍यात खासदार भंडारा संघाकडून मैदानात उतरले.गोंदिया संघावर चाल करून गेलेल्या खासदारांनी पहिल्याच प्रयत्नात एका गड्याला बाद केले. तर तिसऱ्या प्रयत्नात दोन गडी बाद करून खासदारांमधील कबड्डीचा खेळाडू अजून ही कायम आहे हे दाखवून दिले.
कधी काळी उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून ओळख असलेल्या खासदारांनी वयाच्या 53 व्या वर्षीही तोच जोश दाखवीत केलेले खेळाचे प्रदर्शन उपस्थित प्रेक्षकांनाही आश्चर्यचकित करून गेले.स्वतःला सर्वच क्षेत्रात तयार करणाऱ्या खासदारांनी खेळाचा जोपासलेला वारसा आजही त्यांच्या अंगी तसाच कायम आहे हेच यातून सिद्ध झाले. मैदानात उतरलेल्या खासदारांच्या कौतुकासाठी प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला.

blank