35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता पाच लाखाची खंडणी मागणार्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

पाच लाखाची खंडणी मागणार्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

0
530

blank

गोंदिया,दि.16ः– माहिती अधिकार कायद्याच्या वापर करुन विनाकारण त्रास देणार्या व माहिती न देण्याच्या एैवजात पैसे मागणार्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना गोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.त्यामध्ये संजय रमेश बघेले,रा.सटवा डव्वा,लोकेश सोहनलाल कावळे रा.मोहाडी व अजय कृष्णकुमार जायस्वाल गणेशनगर गोंदिया यांचा समावेस आहे.
गोरेगाव पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या गोवारीटोला येथील सुरेंद्र हेमराज रहागंडाले यांच्या कृषी केंद्र व धानाच्या गोदामाचे व घऱाचे सकाळी 7 वाजेच्या सुमारास छायाचित्र काढून संजय रमेश बघेले,लोकेश सोहनलाल कावळे व अजय कृष्णकुमार जायस्वाल यांनी आतमध्ये प्रवेश करतांना फिर्यादी सुरेंद्र रहागंडाले यांनी अडवणूक केली असता आम्ही निस्वार्थ संस्थेअंतर्गत काम करतो,आम्हाला अधिकार आहे असे बोलून फिर्यादीच्या गोदामात प्रवेश करुन भिती दाखवली.तसेच फिर्यादीस 5 लाख रुपयाची मागणी केली.5 लाख रुपये दिले नाही तर माहिती अधिकार अर्ज लावू आम्हच्या विरोधात पोलिसात तक्रार किंवा कारवाई केल्यास तुला जिवानिशी मारु अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने आपल्या तोंडी तक्रारीत पोलिसांना सागिंतले.त्यानुसार पोलीस निरिक्षक यांच्या आदेशाने गैरअर्जदार आरोपीविरुध्द तक्रार नोंदवून त्यांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.दरम्यान फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये आरोपींनी आम्ही अण्णा हजारेंची माणसे असून धान खरेदी केंद्र व गोदाम तपासण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत.यापुर्वी कटंगी येथील रेखलाल टेंभरे यांचे धान खरेदी केंद्र बंद पाडणारे आम्हीच आहोत असे सांगत नाशिक येथील निस्वार्थ बहुउद्देशिय संस्था(रजी.न.10020503)अंतर्गत काम करतो.तुमचे गोदाम हे बेकायदेशीर आहे.माहिती अधिकाराचा अर्ज लावून तुमच्यावर कारवाई करण्याकरीता तक्रार करणार आहोत.तक्रार होऊ द्यायची नसेल व हे प्रकरण येथेच संपावयाचे असेल तर 5 लाख रुपये द्यावे लागतील असे धमकावले.त्यामुळे गावातील नागरिकांनी व पोलिसांनी त्यांना पकडून गोरेगाव पोलीस ठाण्यात आणत असताना आमच्यावर पोलीस कारवाई झाली तर तुला जिवानिशी ठार मारु अशी धमकी दिल्याने आपल्या जिवितास धोका असल्याची तक्रार नोंदवली.त्या तक्रारीच्या आधारे गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरिक्षक सचिन मेहत्रे यांनी दिली असूून पुढील तपास विलास जाधव करीत आहेत.

blank