30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ भागवत ग्रंथ म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा:माजी मंत्री राजकुमार बडोले

भागवत ग्रंथ म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा:माजी मंत्री राजकुमार बडोले

0
32

blank

**बकी मेंढकी येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास प्रारंभ.*

सडक अर्जुनी : (२१ मार्च) ::भागवत ग्रंथात केवळ कथा नाहीत तर भगवंताच्या प्रत्येक कथांमधून प्रत्येक जीवाचा उद्धार कसा करावा हेच सांगितले आहे.या ग्रंथातून अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीला अचूक मार्ग दाखविला आहे. भागवताकडे केवळ कथा म्हणून न पाहता या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि आपण त्यातील काय आत्मसात करायचे हे आपल्याला समजायला हवे.भागवत ग्रंथ म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा आहे.त्यामुळे त्यातील तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे असे मत माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.

संत तुकाराम महाराज बीज उत्सव निमित्त बकी/मेंडकी येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहनिमित्त आयोजित उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री राजकुमार बडोले बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी,भाजप नेते लक्ष्मीकांत धानगाये,पंचायत समितीचे माजी सभापती गिरधारी हत्तीमारे,पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे,ईश्वर कोरे,जागेश्वर गहाणे,जागेश्वर पाथोडे,कृष्णा गहाणे,ओमकार मेंन्ढे,माधो वाढई आदींसह भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.

blank