38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ आला उन्हाळा बाळांचे आरोग्य सांभाळा- डॉ सुवर्णा हुबेकर

आला उन्हाळा बाळांचे आरोग्य सांभाळा- डॉ सुवर्णा हुबेकर

0
32

blank

गोंदिया,22 : मागील काही दिवसा पासून ऊन वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांना निर्जलीकरण होत आहे. त्यामुळे मुलांना भरपूर पातळ पदार्थ द्या, त्यांना ओआरएस म्हणजे क्षरजलसंजीवणी द्या. आला उन्हाळा आता बाळांचे आरोग्य सांभाळा, असे आवाहन डॉ सुवर्णा हुबेकर यांनी केले.

बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील राष्ट्रीय पोशाहर पुनर्वसन केंद्र येथे पोषण पंधरवडा निमित्त सॅम व म्याम बालक यांचे विशेष आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.

या शिबिराचे उदघाटन गंगाबाई रुग्णालयाचे अधीक्षक व प्रसिद्ध बाल रोग तज्ञा डॉ सागर सोनारे एन आर सी चे डॉ अनिल परियाल फार्मसी ऑफिसर निलेश उइके एन आर सी चे मॅनेजर अभिनव ताराळे आहार समुपदेशिका स्वाती बनसोड नर्सिंग ऑफिसर नीलम शुक्ला व रेणुका साहू आदी प्रमुख्याने उपस्थित होते

राष्ट्रीय माता बाळ संगोपन कार्यक्रम अंतर्गत 20 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान पोषण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त सशक्त बालक अभियान अंतर्गत संदर्भ सेवा दिलेल्या सॅम व म्याम बालक यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी व सर्व रक्त तपासण्या डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या मार्फत करण्यात आल्या. सध्या एनआरसी मध्ये 13 कुपोषित बालक उपचार घेत आहेत. बाल रोग तज्ञ डॉ सागर सोनारे यांच्या देखरेखीत बालकांच्या प्रकृतीत चांगलीच प्रगती होत आहे. या कॅम्पमध्ये 27 बालकांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. या कॅम्प साठी एन आर सी च्या श्रीमती रुपाली टोने राहुलकर रजनी वैद्य आदींनी परिश्रम घेतले..

blank