
* सटवा येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत भव्य महिला मेळावा
गोरेगाव- आज महिलांना विविध क्षेत्रात आरक्षण मिळत असून प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे जात आहेत, ही समाधानाची बाब आहे. असे असले तरी अनेक क्षेत्रात महिलांचा होणारा छळ हे काही कमी झालेले नाही. त्यामूळे महिलांना त्यांच्या हक्क व कर्तव्यची जाणीव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा समन्वयक राज्य महिला आयोग रजनी रामटेके यांनी केले.
२२ मार्च २०२२ रोजी स्मार्ट ग्राम सटवा येथे जगत काॅलेज गोरेगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबीर ,जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सटवा व ग्राम पंचायत सटवा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा आयोजित करण्यात आले होते, यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या चित्रकला चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका प्रा.सविताताई बेदरकर, जिल्हा परिषदेच्या दिशा मेश्राम, महिला सरचिटणीस पुरोगामी महिला मंचच्या जयश्री शिरसाट, संगीताताई घासले तालुका महिलाध्यक्ष पुरोगामी महिला मंच, माजी सरपंच गीताताई ठाकूर, कमलाबाई बिसेन, हिरकन ठाकूर, ग्रामसेविका सविता पाटील, शकुंतला कटरे सरपंच कवलेवाडा, वंदनाताई पुरी, उईके ताई आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सविता पाटील यांनी केले.
मार्गदर्शन करताना जयश्री शिरसाटे यांनी स्त्री पुरुष समानता, मुलींचे शिक्षणावर काव्यंमय शैलीत मत व्यक्त केले. संगिताताई घासले यांनी स्त्रीचे समाजात स्थान कसे अबाधित राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले . रजनी रामटेके यांनी स्त्रीया बद्दल कायदेविषयक मार्गदर्शन केले. तर सविता ताई बेदरकर यांनी मुली व मुलांबद्दल आपल्या समाजात असलेले दुप्पटी धोरण अत्यंत मार्मिक शब्दांत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा चित्रकलाताई चौधरी यांनी स्त्रीचे जीवनात किती महत्वाचे स्थान आहे ते पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन लोकेश कटरे यांनी तर आभार प्रदर्शन सरपंच विनोद पारधी सरपंच यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री बिजेवार सर,बिसेन सर, पुरी मैडम, आंगणवाडी सेविका प्रेमशिला रहांगडाले, सरोज ठाकूर, चंद्रहास पारधी यांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी सर्व उपस्थित महिला भगिनींना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





