
तिरोडा : शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या कार्याने प्रभावित होवून गोंदिया जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक सुशील बंसोड यांनी मुंबई येथे आमदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षक भारती संघटनेत प्रवेश केला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, राज्य सरचिटणीस भरत शेलार, दिनेश खोसे, नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर उपस्थित होते. आमदार कपिल पाटील यांनी सुशील बंसोड यांचे शिक्षक भारती संघटनेत स्वागत केले आणि त्यांना गोंदिया जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्त केले.
शिक्षक सुशील बंसोड हे अनेक वर्षांपासून सामाजिक संघटनात्मक कार्यात कार्यरत आहेत. शिक्षकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी शिक्षक भारतीमध्ये प्रवेश केला. ते अनेक सामाजिक संघांनांशी जुडलेले असून जिल्ह्यात उपक्रमशील शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत.शिक्षक भारती संघटनेत प्रवेशाबद्दल जितेंद्र घरडे, प्रकाश ब्राह्मणकर, प्रमेश बिसेन, गुलाब मौदेकर, संतोष बारेवार, नलिनी नागरीकर, विलास डोंगरे, पी.डी. चव्हाण, संतोष डोंगरे, एम.झेड. नांदगाये, राजू टेंभरे, राजू बारसे, संतोष कुसराम, डी.एस. रामटेके, श्याम बावणे, संतोष मेंढे, नेतराम माने, आनंद सोनवाने, रमेश सोनवाने, किशोर बहेकार, नरेश कोरे, रामभगत पाचे, विजय मेश्राम, युवराज मोहारे, पी.एस. रहांगडाले, ममता चुटे, प्रमिळा तूरकर, आशा रहांगडाले, लक्ष्मी ढेकवार, अनिता पटले व शिक्षक भारती पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.





