38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ तालुका आरोग्य अधिका-यासमोर आशा व गटप्रवर्तकांची निदर्शने

तालुका आरोग्य अधिका-यासमोर आशा व गटप्रवर्तकांची निदर्शने

0
34

blank

भंडारा -: महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना तालुका भंडारा च्यावतीने तालुका आरोग्य अधिकारी भंडारा यांना आशा व गटप्रवर्तक यांच्या देशव्यापी संपाची नोटीस व स्थानिक मागण्यांचे निवेदन देण्यासाठी दिनांक 25 मार्चला निदर्शने आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे तालुका आरोग्य अधिकाऱ्या मार्फत दिलेल्या निवेदनात आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावे. तो पर्यंत 18 हजार व 21 हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे. तसेच पीएफ, पेंशन व सामाजिक सुरक्षा लागू करावी. तसेच स्थानिक मागण्यात एनसीडीचे पैसे न देता कामाची सक्ती केली जाते, कुष्ठरोगाचे व क्षय रोगी संशयित शोधण्याचा लक्षांत दिला जातो तो देऊ नये, मानव विकास कार्यक्रमाचे पैसे देण्यात यावे, पल्स पोलिओ लसीकरणाचा मोबदला पूर्वीपेक्षा दुप्पट देण्यात यावा, आशा कर्मचाऱ्यांना त्यांना दिलेल्या मोबदल्याची पेशीट देण्यात यावी, जेणेकरून त्यांना समजेल की कोणत्या कामाचे किती पैसे मिळाले, आशांना गटप्रवर्तकांच्या जागी बढती देण्यासाठी वयाची अट व उत्कृष्ट परफार्मंन्सची अट रद्द करण्यात यावी. आदी मागण्यांचा समावेश होता. याप्रसंगी 28,29 मार्चच्या देशव्यापी संपात व 28 च्या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
शिष्टमंडळात युनियनचे जिल्हा संघटक राजू बडोले, आयटकचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके, युनियन च्या भंडारा तालुका अध्यक्ष वनिता भुरे, राखी बसेशंकर, कुमुद रामटेके, मनीषा निंबार्ते इत्यादींचा समावेश होता.

blank