34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News पुण्यातील कात्रजमध्ये एकापाठोपाठ 20 सिलिंडरचे स्फोट

पुण्यातील कात्रजमध्ये एकापाठोपाठ 20 सिलिंडरचे स्फोट

0
22

पुणे -शहरातील कात्रज भागात 20 सिलिंडरचे स्फोट झाल्याची घटना कात्रजमधील गंधर्व लॉन्स परिसरात घडली. 20 सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अजुनपर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारीही घेण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज, गंधर्व लॉन्सजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे 100 गॅस सिलिंडरचा साठा करण्यात आला होता. यामध्ये अचानक स्फोट झाला. एकामागून एक 20 गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. सिलिंडरचे हे स्फोट झाल्याने आसपासचा परिसर हादरला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

blank