
️ गोंदिया:- संगीत क्षेत्रातील महान कलाकार लता मंगेशकर, बप्पी दा, एस.पी.बालसुब्रमण्यम आणि इतर संगीतकार कलाकाराना श्रद्धांजलि वाहन्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील कलाकार बाँधवांतर्फे संगीतमय कार्यक्रम “मेरी आवाज़ ही पहचान है” शुक्रवार, ०१ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता गोंदियाचे हृदय असलेल्या हिंदी टाऊन स्कूलच्या प्रांगण येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। श्री रामदेवरा मंदिर रेलटोली येथे य्या संबंधित विषयावर नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी उपस्थित बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले विचार व सहकार्य देण्याचे सांगितले. “संगीत क्षेत्रातील दिग्गजांना श्रद्धांजली – मेरी आवाज ही पहचान है” या चर्चेत गोंदियातील कलाकार परिवारातर्फे *संगीत कार्यक्रम आगामी 01 एप्रिल 2022 रोजी गोंदिया, नगर परिषद हिंदी टाऊन स्कूल ग्राउंडच्या मागे, शारदा वाचन* येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत तिलक दीप, राजकुमार चौरसिया, अतुल सतदेवे, मितेश परमार, आशिष देशभ्रतार, कमल अग्निहोत्री, दिलीप कोसरे, शुभम तिवारी-1, शुभम तिवारी-2, जय परमार, सुनील जैस्वाल, हितेश ठाकुर, हिरेश, अविनाश करोशीया, अनूप बोरकर, रत्नेश बैस, विजयानंद आदी प्रमुख्याने उपस्थित होते. सर्व वादक, गायक, कलाकार मित्र यांनी जाहीरपणे मनोगत व्यक्त केले आणि सर्वांच्या सहकार्याने संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वानुमते चर्चा झाली. संगीत रसिकांनी कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कलाकार परिवाराने केले आहे.