
देवरी – येथील सुप्रसिध्द धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात दरवर्षी दोन्ही नवरात्रात दरदिवस विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम तथा उपक्रमासह उत्साहात नवरात्र साजरा करण्यात येत होते. परंतू , मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सदर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
यावर्षी मात्र कोरोनाच्या बंधन मुक्तीनंतर पुन्हा विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले आहे. यात २ एप्रिल शनिवारला दुपारी ३ वाजता गुढीपाडवा निमीत्त मोटार सायकलला भगवे ध्वज लावून महाराष्ट्रीयन वेशभूषेत महिला आणि पुरुषांची भव्य मोटारसायकल शोभायात्रा देवरी नगरात भ्रमण करुन राम मंदिराचे दर्शन घेऊन सायंकाळी धुकेश्वरी मंदिरात ज्योती प्रज्वलित करण्यात येतील. यानंतर मंदिरात दरदिवशी सायंकाळी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. यात पुन्हा दांडिया स्पर्धा सुध्दा आयोजीत केली आहे.
अंतिम दिवशी म्हणजेच १० एप्रिल रविवारला सायंकाळी महिलांना भगिनींना साडी वितरीत करुन ज्योती कलश विसर्जन झाल्यानंतर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
तत्पूर्वी नियोजन सभेला मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार, उपाध्यक्ष कुवरलाल भेलावे, सचिव सुशील शेंद्रे, सहसचिव आनंद नळपते, कोषाध्यक्ष भय्यालाल चांदेवार, प्रा. मधुकर शेंद्रे, क्षीरसागर गुरुजी, छोटेलाल बिसेन, संपतलाल अग्रवाल, पवन कटकवार, जितेंद्र मोहुर्ले, सविता पुराम, पारबता चांदेवार, सुमन बिसेन, प्रज्ञा संगीडवार, वैशाली संगीडवार, माया राजनकर, वर्षा शेंद्रे आणि सरोज शेंद्रे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्वांनी सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.





