
गोंदिया-ता.31- गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर गोंदिया तालुक्यातील दत्तोरा येथे शनिवारी व रविवारी(ता.2,3) संत भंगाराम बाबा जत्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विनोद अग्रवाल राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी नयना गुंडे,कल्याणी जगताप, शिक्षणाधिकारी महेंद्र मोठघरे, गट विकास अधिकारी डी.एम. खोटेले,जि.प.सदस्य लक्ष्मी तरोने, नगरसेविका भावना कदम, जितेश राणे, राजीव ठकरेले,अशोक गुप्ता, पं.स.सदस्य मुनेश रहांगडाले, मीनाक्षी बारलिंगे, लोको पायलट राजेंद्र जगताप, मुरपार सरपंच यशवंत गेडाम, चुलोद सरपंच लतीश बिसेन, नवरगाव खुर्द सरपंच नमिता तेढहा, इर्री सरपंच दुर्गा मेंढे, दत्तोरा सरपंच उर्मिला महारवाडे, आसोली सरपंच भागरता धुर्वे, गुदमा सरपंच संगीता गणवीर, टेमनी उपसरपंच शिवलाल नेवारे, दत्तोरा उपसरपंच सुरज चुटे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी संत भंगाराम बाबा यांची भव्य मिरवणूक काढून यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी पंढरपूर येथील प्रसिद्ध समाज प्रबोधनकार व शिवचरित्रकार गौरीताई सांगळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते होणार असुन या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक रमेश चांडक, जि. प. सदस्य संजय टेंभरे,भास्कर रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जत्रेचे आयोजन शुद्धा करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी या जत्रा उत्सवाचा लाभ घेण्याचे आव्हान आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.





