
गोंदिया,दि.01ः.कोराना काळात विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले,यावर विभागीय आयुक्त नागपूर यांच्या प्रेरणेने व प्रादेशिक प्राधिकरण नागपूर आणि प्रथम फाउंडेशनच्या संकल्पनेतून आकाशवाणी केंद्र नागपूर वरुन शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळा बाहेरची उपक्रमाच्या माध्यमातून मंगळवार , गुरुवार व शनिवारला सकाळी 10-30 वाजता शैक्षणिक चर्चेतून शिक्षण सुरू आहे.280 व्या भागात जिल्हा परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा पांजरा केंद्र कामठा पंचायत समिती गोंदिया येथील इयत्ता पाचवीची विद्यार्थींनी कु. दिव्या जितलाल भेलावे हिची आकाशवाणी नागपूर येथून शैक्षणिक मुलाखत प्रसिद्ध झाली.यात टि.व्ही.वरचे कोणकोणते कार्यक्रम बघता व कां ? ” आठवा व सांगा ” या विषयावर आकाशवाणी द्वारे प्रसारित करण्यात आले.गावातील विद्यार्थ्यांसाठी आकाशवाणीवर बोलण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विभागीय आयुक्त यांचे गावकर्यानी आभार मानले .कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रभारी गटशिक्षणाधिकारी जे.एस.राऊत यांनी मार्गदर्शन केले.मुख्याध्यापिका सौ.रंगारी, पदवीधर शिक्षक मनिषकुमार राठोड ,विषय शिक्षक प्रमोदकुमार बघेले ,विषय शिक्षिका कांचन मोहबे.सहाय्यक शिक्षक दशरथ हजारे,एम.बी.पानतावणे ,सि.आर.शहारे आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ललीत नागपूरे यांनी अथक परिश्रम केले.प्रथम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक अजय इंगळे व अविनाश चतुरकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .





