
आमगाव –पोलिस ठाण्यांतर्गत आमगाव पोलिस ठाणे परिसरातील सुपलीपारटोला येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी एकूण ५१ हजार ५५0 रुपयांचा मुद्देमाल पकडला. दरम्यान, ५ आरोपींवर कारवाई करून त्यांना अटक केली आहे. ही घटना बुधवार, ३0 मार्च रोजीची आहे.
सविस्तर असे की, अवैध धंद्यांवर आळा बसावा यासाठी स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलिस ठाण्याच सर्व प्रभारी अधिकार्यांना पेट्रोलिंग करण्याचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने आमगाव पोलिस ठाणे परिसरात पथक पेट्रोलिंगवर असताना आमगाव परिसरातील सुपलीपारटोला येथील शेतशिवारात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांना सापळा रचून जुगार अड्डय़ावर धाड टाकली. यावेळी सतिश तेजराम मेंढे (वय ३२) रा. सुपलीपार, संतोष तेजराम मेंढे (वय ३७) रा. सुपलीपार, टिकाराम उरकुडा भांडारकर (वय ५४) रा. भोसा, तिर्थराज मोतीराम बंसोड (वय ५३) रा. डोंगरगाव व सहसेराम पांडुरंग बिसेन (वय ५0) रा. टेकरी या आरोपींना ताब्यात घेतले. यांच्याकडून तासपत्ते, रोख व मोबाईल असा एकूण ५१ हजार ५५0 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थागुशाचे पोनि. बबन आव्हाड यांच्या नियंत्रणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. मनोज उगडे, सफौ. गोपाल कापगते, तुलसीदास लुटे, विठ्ठलप्रसाद ठाकरे, रियाज शेख, चेतन पटले, संतोष केदार, विजय मानकर आदींनी पार पाडली.




