37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील लाखोचा मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादींना केला परत!

घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील लाखोचा मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादींना केला परत!

0
46

blank

अर्जुनी-मोरगाव : घरफोडी व जबरी चोरीच्या प्रकरणांचा मोठ्या शिताफीने अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी शोध लावला. तसेच न्यायालयाच्या आदेशाने सदर गुह्यातील मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादीना परत केले.

सविस्तर असे की, अर्जुनी-मोरगावमधील साई सर्वेश्वर बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी चोरी करून सुमारे 1 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. ही चोरी 01 मार्च 2022 रोजी पहाटे झाली होती. तसेच 09 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी  फिर्यादी मुनेश्वर नामदेव लुटे रा. प्रतापगड हे अर्जुनी ते प्रतापगड मोटरसायकलने खैरी जंगल शिवारातील रस्त्याने जात असताना दोन अनोळखी चोरट्यांनी मोटरसायकलवरून फिर्यादीचा रस्ता अडवला. फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून त्यांना गाडीवरून खाली उतरले व लाथा-बुक्क्यांनी खूप मारहाण केली. तसेच जंगलातील एका झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर फिर्यादीच्या खिशातील पाकीट काढून घेऊन पळून गेले. त्या पाकिटामध्ये 4500 रुपये व इतर महत्वाची कागदपत्रे होती.

अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी अतिशय शिताफीने दोन्ही गुन्ह्यांचा तपास करून गुन्हा करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली होती व त्यांनी चोरून नेला मुद्देमाल देखील हस्तगत केलेला होता.

न्यायालयाने या दोन्ही गुन्ह्यातील पोलिसांनी हस्तगत केलेला सर्व मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्याचे आदेश केल्याने साई सर्वेश्वर बारचे मालक राजाराम मारुती फुलेवार यांना त्यांचे 99,000 रुपये व इतर साहित्य तसेच प्रतापगडचे मुनेश्वर नामदेव लुटे यांना 4500 रुपये व इतर साहित्य उपविभागीय पोलीस अधिकारी (देवरी) संकेत देवळेकर यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले. अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे.

या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, संभाजी तागड तसेच पोलीस नाईक प्रवीण बेहरे, रमेश सेलोकर, गौरीशंकर कोरे, श्रीकांत मेश्राम यांनी केला आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल गोंदिया यांनी सहकार्य केले.

blank