32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ गोवर्धन चौक छोटा गोंदिया येथे शहिद स्मारक व समाज भवनाचे बांधकाम करा

गोवर्धन चौक छोटा गोंदिया येथे शहिद स्मारक व समाज भवनाचे बांधकाम करा

0
45

blank

आदिवासी गोवारी समाज संघटनेची मागणी
खा.सुनिल मेंढे यांना निवेदन
गोंदिया : शहरातील प्रभाग क्र.२ मधील गोवर्धन चौक छोटा गोंदिया येथील भु.क्र.३५०, ३४९ व ३४८ ही शासकीय जमीन असून शासनाने ही गवत आखराची जमीन म्हणून आदिवासी गोवारी समाजाला प्रदान केली आहे. या जमिनीवर वर्षानुवर्षांपासून आदिवासी गोंड गोवारी समाज बांधकाम पुजा अर्चना व गाव गोधन, बिरसा मुंडा जयंतीचे कार्यक्रम साजरे करीत असतात. करीता या जागेवर शहिद ११४ आदिवासी गोवारी समाज बांधवाच्या स्मृतित शहिद स्मारक व समाजभवनाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात खा.सुनिल मेंढे यांना निवेदन देण्यात आले आहे.
प्रभाग क्र. छोटा गोंदिया येथील शासकीय जमीन शासनाने धार्मिक सण, उत्सव साजरे करण्याकरीता वापरण्यात येते. शासनाने ही गवत आखराची जमीन म्हणून आदिवासी गोवारी समाजाला प्रदान केली आहे. सदर खुली असून गावातीलच काही लोकांनी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. या संदर्भात गोवारी समाजातील काही लोकांनी याची माहिती निवेदनातून प्रशासनाला दिली. तहसीलदार यांनी अतिक्रमण धारकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढण्यात आले. असे असले तरी या जागेच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच आहे. परिणामी सदर जागेवर शहिद ११४ आदिवासी गोवारी समाज बांधव यांच्या स्मृतीत शहिद स्मारक व समाज भवनाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष सुशिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देवून खा.सुनिल मेंढे यांनी स्थानिक विकास निधीतून शहिद स्मारक व समाजभवनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी केली आहे. यावेळी सचिन शेंदरे, भाऊ गजबे, यशवंत नेवारे, मनीष राऊत, विक्की वाघाडे, राजा कोहरे, विशाल राऊत, दिपक नेवारे आदि उपस्थित होते.

blank