35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

0
52

blank

गोंदिया-स्थानिक बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या आवारातून दोन दिवसांपूर्वी यशवंत ठाकरे रा.भजेपार याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या घटनेचे गांभीयार्ने दखल घेत गोंदिया पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात चोरट्यास जाळ्यात फासले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आले. आशिष रेखलाल राऊत (१९) रा.वडेगाव ता.तिरोडा हमु.हिवरा असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात फिर्यादी यशवंत ठाकरे हा दुचाकीने आला होता. ३ एप्रिलपूर्वी त्याची दुचाकी क्र.एमएच-३५/डब्ल्यू-८६८५ रूग्णालयाच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्याने दखल घेत शहर पोलिसांनी तपासकायार्ला सुरूवात केली. गोपनिय माहितीच्या आधारावर हिवरा येथील आशिष रेखलाल राऊत (१९) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने रूग्णालय आवारातून दुचाकी लंपास केल्याची कबूली दिली. यावरून दुचाकी क्र.एमएच-३५/डब्ल्यू-८६८५ व दुचाकी क्र.एमएच-३५/एन-८३३५ अशा दोन दुचाकी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक विश्‍व पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि महेश बन्सोडे, सपोनि रामभाऊ होंडे, जागेश्‍वर ऊईके, सुदेश टेंभरे, अरविंद चौधरी, ओमेश्‍वर मेर्शाम, योगेश बिसेन, सतिश शेंडे, दिपक रहांगडाले, संबोध बिसेन, विकास बेदर, कुणाल बारेवार यांनी केली.

blank