
एकोडी : जवळील सेजगाव येथील मामा तलाव येथील पटांगणावर भव्य इनामी शंकरपटाचे आयोजन १५ एप्रिल पासून करण्यात आले आहे. शंकरपटाचे उद्घाटन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य पवन पटले तर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ओम कटरे, कृउबास सभापती चिंतामन रहांगडाले, सरपंच कंठीलाल पारधी, पं.स. सदस्य ज्योती शरणागत उपस्थित राहणार आहेत. या शंकरपटाचे प्रथम पारितोषिक १५ हजार तर दहावे पारितोषिक २१०० रुपये ठेवण्यात आले आहे. १७ एप्रिल रोजी बक्षिस वितरण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून राकाँचे रविकांत बोपचे, ओमप्रकार पटले, पं.स. सदस्य ज्योती शरणागत, सरपंच के.के. पारधी यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी परिसरातील शेतकर्यांनी शंकरपटात सहभागी व्हावे, असे आव्हान आयोजन समितीचे माधव गठलकार, गौरीशंकर पारधी, कन्हैलाल गठलकार, सोनु सोनेवानेसह सेजगाव ग्रामवासीयांनी केले आहे.




