
मुंबई | राज्यातील राजकारण विविध मुद्यांनी चांगलंच गाजत आहे. यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) कुटुंबीयांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा(Toilet Scam) केला असून लवकरच हा घोटाळा बाहेर काढण्यात येईल असा इशारा दिला होता. यावर आता किरीट सोमय्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.