गोंदिया,दि.21ः- तालुक्यातील ग्राम पंचायत सेजगाव खुर्द येथे १९ ते २२/०४/२०२२ पर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत “मी समृद्ध तर गाव समृद्ध” आणि ” गाव समृद्ध तर मी समृद्ध” हा गावाचा दशवार्षिक सूक्ष्म आराखडा नियोजन राबविण्याकरिता कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात ग्राम पंचायत सरपंचा अर्चनाताई कंसरे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आली.उदघाटक म्हणून माजी उपसभापती धनेन्द्र अट्रे होते. दशवार्षिक सूक्ष्म आराखडा नियोजन करिता नियंत्रण अधिकारी डी.एच.लांजेवार (CFP), प्रशिक्षक म्हणून मुनेश्वर बिसेन (स.का.अ.),डी.झेड.लिल्हारे (ता. अ.),विनोद धावडे (ता. अ.) उपस्थित होते.कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपसरपंच प्रमोद पटले सह सर्व सदस्य/सदस्या, सर्व कर्मचारी, त. मु. अ. भोजलाल बिसेन, पो. पा. विजय टेंभरे, सर्व शिक्षक वर्ग आशा सेविका, अंगणवाडी सेविका ग्रा. प. अंतर्गत येणारे सर्व समित्यांचे अध्यक्ष व सदस्य आणि गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.