29.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान

महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान

0
23

blank

चंद्रपूर- शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान सुरू आहे. पावसाळा सुरू होण्याआधी सर्व नाल्यांची सफाई करून पावसाचे पाणी सुरळीत वाहण्यास मोकळे केले जात आहेत.
मनपा प्रशासक तथा आयुक्त राजेश मोहिते यांच्या सूचनेनुसार मॉन्सून पूर्व तयारी केली जात आहे. विवेकनगर येथील उत्तम नगर ते मूल रोड पर्यंतचा नाला साफ करण्यात आला. तसेच झोन 2 अ मधील सटवाई नाल्याची सफाई करण्यात आली. याशिवाय सरदार पटेल महाविद्यालय जवळील नाल्यातील गाळ काढण्यात आली.
स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल शेळके यांनी झोन 2 ब या भागात जावून पाहणी केली. मान्सूनपूर्व मोठे नाली सफाई रविवारी सुट्टीच्या दिवशी चालु ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या.