
तलाठ्याविरोधात देवरी पोलीसात गुन्हा दाखल…
देवरी:-तालुक्यातील चिचगड येथील तलाठ्याने देवरी येथील श्री गणेश मेडीकलच्या मालकाला माझ्याशी औषधाचे पैसे का मागतोस या कारणावरुन मारहाण करीत दंबगगिरी केल्याची घटना 11 मे च्या रात्री 9.30 वाजता घडली असून याप्रकरणात देवरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शहरातील पोलीस स्टेशन समोर असलेल्या श्री गणेश मेडीकलचे मालक अरविंद शेन्डें हे रात्री ९.३० वाजता मेडीकल बंद करीत असताना चिचगडचे तलाठी प्रकाश चव्हाण यानीं मेडीकल मालक अरविन्द शेन्डे याना औषधी मागितली असता 30 रुपयाची औषधी शेंडे यांनी चव्हाण यांना दिली.आणि 30 रुपयाची मागणी केली असता तलाठी चव्हाण यांनी मेडीकल दुकानाच्या मालकास औषधिच्या पैशाची मागणी का केली असे म्हणत अश्लिल भाषेत शिविगाळ करीत मारहाण केली.याप्रकारामुळे मेडीकलचे मालक अरविंद शेंडे यानी तत्काळ देवरी पोलीस स्टेशन गाठत सदर प्रकरणाची तक्रार नोंदवली असून पोलिसांनी कलम ३२३, ५०४, ५०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.





