34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता बालिकेवर अत्याचार; आरोपीला जन्मठेप

बालिकेवर अत्याचार; आरोपीला जन्मठेप

0
63

blank

यवतमाळ- तालुक्यातील बोरगाव येथे चॉकलेटचे आमिष देऊन सहा वर्षांच्या मुलीवर नराधमाने अत्याचार केला. ही घटना १३ मार्च रोजी महसी हा खटला फास्ट ट्रॅकवर आला. गुरुवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश दारव्हा यांनी आरोपीला तीन वेळा जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षा एकच भोगायच्या आहेत.
संजय ऊर्फ मुक्या मोहन जाधव (वय २४) असे नराधमाचे नाव आहे. त्याने गावातीलच सहा वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दिले. तिच्यावर. अत्याचार केला. नंतर पाच रुपये देऊन कोणाला काही सांगू नको असे म्हणत धमकी दिली. पीडित मुलीची आई रोजमजुरी करून घरी परत आल्यानंतर तिला मुलीच्या कपड्यावर रक्ताचे डांग दिसले. तिने मुलीकडे चौकशी केली असता मुलीने संपूर्ण घटनाक्रमं सांगितला. आईने तत्काळ आणी पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दिली. आर्णी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडिता व आरोपी यांची वैद्यकीय तपासणी केली. गुन्हा नोंदवून आरोपपत्र दाखल करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश दारव्हा हलमनवर यांच्या न्यायालयात १२ साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी वकील निती दवे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपीला बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा नुसार आजीवन कारावास, कलम ३७६ अंतर्गत आजीवन कारावास आणि अँट्रॉसिटी कायद्यानुसार आजीवन कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा आदित्य मिरखेलकर, अनिल आहे व ठाणेदार पितांबर जाधव यांनी केला. उपलब्ध झालेल्या आर्टिकल्स रासायनिक परी क्षणासाठी पाठविले. पीडिता, फियार्दी व साक्षीदारांचे जवाब नोंदविले. पीडिताचे रक्त आरोपीच्या कपड्यावर आढळून आले. याशिवाय वैद्यकीय अहवाल, डीएनए अहवाल यावरून आरोपीने अत्याचार केल्याचे सिद्ध झाले.

blank