
अर्जुनी/मोर- विश्वातील मानव जातीच्या उत्थानासाठी प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्रीचा संदेश देत,महाकारूनिक तथागत भगवान बुद्धाच्या पंचशीलाचे अनुसरण करण्याचा उपदेश अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी केले.
नजीकच्या धम्मकुटी काळीमाती येथे वैशाखी पौर्णिमेच्या पर्वावर भगवान गौतम बुद्धांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते पुढे म्हणाले, बुद्ध धम्म हा विज्ञानवर आधारित शास्त्रशुद्ध धम्म असून, या धम्मात अंधश्रद्धेला वाव नाही. धम्मातील प्रत्येक बाब मानव विकासाला पूरक असून , सुखी, संपन्न जीवन जगण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी आहे.त्यासाठी समाजबांधवांनी उत्सवप्रेमी होण्यापेक्षा आचारणप्रेमी होण्याची नितांत गरज आहे.काळीमाती धम्मकुटी हा निसर्ग सौंदर्याने नटलेला सुंदर परिसर असून, या परिसराचा येत्या काही दिवसात विकासात्मक दृष्टया ,शासन स्तरावरून पाठपुरावा करून विकास साधला जाणार असल्याचे प्रतिपादन केले.
सर्वप्रथम पंचशील ध्वजारोहण करून, बुद्धवंदना घेण्यात आली व भगवान गौतम बुद्धाना आदरांजली अर्पण करण्यात आली.
प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि. प.गोंदियाचे नवनियुक्त उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर यांनी केले.धम्मकुटी काळीमाती ही बौद्धांचे पवित्र श्रद्धास्थान असून ,याठिकाणी परिसरातील कौटुंबिक मंगलमय कार्यक्रमासाठी पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले.याप्रसंगी एकता मंच अर्जुनी/मोर.च्या वतीने नवनियुक्त जि. प .उपाध्यक्ष यशवंत गणवीर याना शाल, पुष्पगुच्छ, व पेढा भरवून अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अर्जुनी/मोर.च्या नगराध्यक्ष मंजूषा बरसागडे,बौध्द उपासक महासंघाचे तालुकाध्यक्ष सोनदास गणवीर , समता सैनिक दलाचे अध्यक्ष टेम्भुरणे,प्राध्यापक मुन्नाभाई नंदागवळी ,सहायक पोलीस निरीक्षक किंजळे , इंजि.संतोष मेश्राम, गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम आदी मान्यवर व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते .या उत्सवानिमित्त यशवंत गणवीर यांनी अल्पोहाराची व्यवस्था केली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सु.मो.भैसारे यांनी केले तर आभार नागेंद्र खोब्रागडे यांनी केले.
अर्जुनी मोर. तालुक्यात बुध्द पोर्णिमा थाटात साजरी
अर्जुनी मोर. :– तालुक्यातील संपुर्ण गावातील बुध्द विहारात वैशाख बुध्द पोर्णिमा थाटात साजरी करण्यात आली.
सकाळ पासुनच शुभ्र वस्र परिधान करून महिला पुरुष व युवा वर्ग आपआपल्या गावातील बुध्द विहारात गोळा झाले.बुध्द पुजापाठ बुध्द वंदना व त्रिशरण पंचशील ग्रहण करुन तथागत बुध्द व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. अर्जुनी मोर येथे बौध्द युवा संघ व समस्त कर्मचारी वर्ग व ग्रामवासी बौध्द बांधवांच्या सौजन्याने जुना बसस्थानकाजवळ पोहा व मठ्ठा वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन वैद्यकिय अधिकारी डाॅ. भारत लाडे, यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अभियंता अमित शहारे होते.यावेळी प्रशांत लाडे, कुणाल मेश्राम, राहुल लाडे,नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, जितेंद्र साखरे, बादल लाडे,विक्रम शहारे, तुषार सांगोळे, बुध्दम लाडे,पि.एन.जगझापे, सु.मो.भैसारे,कास्मीद शहारे, प्रफुल खोब्रागडे, वतन शहारे, प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन जगझापे सर यांनी तर आभार प्रशांत लाडे यांनी केले.यावेळी शेकडो लोकांनी पोहा व मठ्ठ्याचा लाभ घेतला.





