35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता ओडिशावरून गोंदियाला येणारा गांजा पकडला

ओडिशावरून गोंदियाला येणारा गांजा पकडला

0
86

blank

गोंदिया,दि.१७ः  ओडिशा येथून गोंदियाला येणारा २८ किलो ५0 ग्रॅम गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.१२) रात्री डव्वा येथे पकडला. या प्रकरणात अटक करण्यात आलेले चौघेही आरोपी येथील असून त्या आरोपींना गुरुवारपयर्ंत (दि.१९) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत संजय काशिनाथ बन्सोड (४१, रा. वॉर्ड क्रमांक १७, श्रीनगर), अजय हगरु राहुलकर (५३, रा.सुंदरनगर, भीमनगर), गुलाब घनश्याम गिरी (३१, रा. मजितपूर, गंगाझरी) व अरुण केवल चौरे (३७, रा. कुंभारटोली) यांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी (दि.१२) सायंकाळी डुग्गीपार परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोंदिया येथील अरुण चौरे नावाची व्यक्ती त्याची कार क्रमांक एमएच 0४-इक्यू ५३३३ ने ओडिशा येथून गांजा घेऊन गोंदियाला येत आहे अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक तेजेन्द्र मेर्शाम, सहायक फौजदार गोपाल कापगते, पोलीस हवालदार तुलसीदास लुटे, पोलीस नायक सोमेंद्रसिह तुरकर, पोलीस नायक रियाज शेख, पोलीस शिपाई संतोष केदार, विजय मानकर, चालक पोलीस हवालदार बंजार यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम डव्वा गाठून गावातील मुख्य रस्त्यावरील ताज चिकन सेंटरसमोर नाकाबंदी केली.
सायंकाळी ७.३५ वाजता कार क्रमांक एमएच 0४-इक्यू ५३३३वकार क्रमांक सिजी 0४-झेडएक्स ७७५५ या वाहनांतून २८ किलो ५0 ग्रॅम वजनाचा गांजा किंमत तीन लाख ३६ हजार ६00 रुपये, दोन चारचाकी वाहने किंमत ७ लाख व दोन मोबाईल किंमत ११ हजार असा एकूण १0 लाख ४७ हजार ६00 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात मादक पदार्थ विरोधी अधिनियम कलम ८(क), २0(क),२९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आरोपींना गुरुवारपयर्ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

blank