|
गडचिरोली-महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम, अविकसित, उद्योगविरहित, नक्षलप्रभावी जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात ७८ टक्के व्याप्त जंगल असून अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे हत्ती कॅम्पसाठी प्रसिद्ध आहे. या हत्ती कॅम्पच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये पर्यटनस्थळ म्हणून थोड्याफार प्रमाणात रोजगार मिळत आहे. त्यामुळे कमलापूर हत्तीकॅम्प स्थलांतरित करू नये, अशी मागणी खा. अशोक नेते यांनी पर्यावरण एव जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे सचिव डॉ. सुनील शर्मा यांचेकडे निवेदनातून केली आहे.
कमलापूर येथील हत्तीकॅम्प गुजरात येथे स्थलांतरित करण्यासाठी हालचालीचालू झालेल्या होत्या. त्यामुळे जनतेमध्ये भारतसरकार विरुद्ध नाराजी दिसून आलेली होती. गुजरातपेक्षा गडचिरोली जिल्हा हा जंगल व्याप्त जिल्हा असल्याने हती कॅम्पला राहण्यासाठी पोषक वातावरण व शांत स्वभाव निर्माण झालेला आहे. त्यासाठी हतीकॅम्पला सुविधाजनक, पर्यटन व रोजगार मिळावा याकरिता खास.अशोक नेते यांनी दिल्ली येथे पर्यावरणवण एवं जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे सचिव डॉ. सुनील शर्मा यांची भेट घेऊन अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प स्थलांतरित करू नये, अशी सूचना देऊन निवेदनाद्वारे कळविण्यात आले.
|