
चंद्रपूर,दि.20:-मूल चंद्रपूर मार्गावरील चिचपल्लीपासून काही अंतरावर असलेल्या अजयपूर येथे झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली.या घटनेने सर्वत्र खळबळ माजली असून राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मृतकांच्या नातेवाईकांना तातडीने मुख्यमंत्री निधीतून 5 लाख रुपयाची मदत करण्याची मागणी केली आहे.
सविस्तर असे की, 19 में रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास वडसावरून चंद्रपूरला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक क्रमांक Mh 31 cq 2770 व चंद्रपूरवरून मूलकडे जाणारा डीझल टँकर क्रमांक Mh 40 BG 4060 या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रकला आग लागली.आगीने बघता बघता भीषण रूप धारण केल्याने पूर्ण ट्रक व त्यामध्ये असलेले 9 जण जळून खाक झाले.
लाकूड भरलेल्या ट्रकमध्ये वाहनचालक 30 वर्षीय अजय सुधाकर डोंगरे BTS प्लॉट, बल्लारपूर, 33 वर्षीय प्रशांत मनोहर नगराळे, 30 वर्षीय मंगेश प्रल्हाद टिपले, 25 वर्षीय महिपाल परचाके, 46 वर्षीय बाळकृष्ण तुकाराम तेलंग, 40 वर्षीय साईनाथ बापूजी कोडापे राहणार नवी देहली, 22 वर्षीय संदीप रवींद्र आत्राम रा. तोहोगाव कोठारी हे सर्व मजूर लाकूड उतरविण्यासाठी चंद्रपूरला येत होते. तर डीझल टँकर मध्ये वाहनचालक 35 वर्षीय हनिफ खान रा. अमरावती, कंडक्टर 35 वर्षीय अजय पाटील वर्धा दोघेही ट्रक मध्ये होरपळून मृत पावले.





