38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पोलीस पाटील संघटनेचे एसडीओंना निवेदन

पोलीस पाटील संघटनेचे एसडीओंना निवेदन

0
66

blank

गोंदिया,दि.21- पोलीस पाटील संघटना गोंदियाच्या वतीने विविध मागंण्याना घेऊन गोंदियाच्या उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करुन निवेदन सादर करण्यात आले.पोलीस पाटलांना कुठले प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहेत यासह विविध विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात यावे.दर ३ महिन्यांनी पोलीस पाटलांसोबत बैठक आयोजित करुन येणाऱ्या अडचणी सोडविण्यात यावे.कोरोना काळात पोलीस पाटलांनी केलेल्या कार्याबाबत “कोरोना योध्दा” चे प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात यावे, निवडणुकीच्या वेळी पोलीस पाटलांना मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत आदेश देऊन निवडणुक भत्ता देण्यात यावे.आंगणवाडी सेविकांसारखे पोलीस पाटलांचे सुध्दा सेवानिवृत्ती वय वाढवून ६५ वर्ष करण्यात यावे, पोलीस पाटलांना सेवानिवृत्ती नंतर वृद्धापकाळात सन्मानाने जीवन जगण्यासाठी पेंशन लागु करण्यात यावे किंवा सरसकट ५ लाख रूपये देण्यात यावे, ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये काळानुसार दुरुस्ती करण्यात यावी, पोलीस पाटलांच्या रिक्त असलेल्या जागा त्वरित भरण्यात याव्या, (“पोलीस पाटील कल्याण निधी बाबत” – पोलीस पाटील कल्याण निधी ची लवकरात लवकर स्थापना करण्यात यावे, अटल पेंशन योजना सर्व वयातील पोलीस पाटलांना लागु करण्यात यावे, जिल्हाच्या ठिकाणी पोलीस पाटील भवन निर्माण करण्यात यावे, ज्या पोलीस पाटलांना २-३ किंवा जास्त गावांचा अतिरिक्त कारभार देण्यात येतो- त्याबाबत अतिरिक्त मोबदला देण्यात यावे आदी मागण्याचा समावेश होता.यावेळी उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत मागण्या शासनाकडे पाेचविण्याचे आश्वासन दिले.निवेदन देतेवेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण कोचे,उमेशकुमार बावनकर, जिल्हा संघटक कुंजीलाल भगत,लक्ष्मीकांत कोल्हे, सचिव देवेंद्र नागपुरे, सौ. बबिता शेंडे, राजु कडव, सौ. मंगला तिडके, हेतराम रहांगडाले, विनायक राखडे, ओमेश्वर लाडे, विनोद नंदेश्वर, पुरणलाल डाहाके उपस्थित होते.

blank