नगरपालिकेची कारवाई: उद्या ही मोहीम सुरूच राहणार
देसाईगंज दि २५ :::देसाईगंज शहरातील मुख्य महा मार्गावरील रस्त्याचे लगतचे कच्चे व पक्के अतिक्रमण हटविन्यासाठी नगर परिषदेच्या वतीने बुलडोझर चालविले. या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे अतिक्रमण धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ही मोहीम उद्या देखील चालूच राहणार असल्याने अनेकांनी आपले अतिक्रमण स्वतः काढण्यास सुरुवात केली आहे.
आज मुख्याधिकारी नगरपालिका देसाईगंज यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग, भुमी अभिलेख विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व पोलिस विभाग या पाच विभागांच्य संयुक्त विद्यमाने मुख्य बाजारपेठेतील थोरात चौक ते फवारा चौक ते भारतीय स्टेट बँक ते दुर्गा माता मंदिर ते जुनी महात्मा गांधी शाळा ते आयडीबिआय ते फवारा चौक या मार्गावरील वाहतूकीसाठी होणारा अतिक्रमण आज काढण्यात आले.
ह्या अतिक्रमण हटाव मोहिमेत नगर परिषद देसाईगंज चे मुख्याधिकारी विजय कुमार आश्रमा , कार्यालय अधीक्षक महेश गेडाम नगर विकास विभाग प्रमुख दानिशोद्दीन काझी, बांधकाम अभियंता साई कोंडलेकर, महसूल विभागाच्या नायब तहसीलदार बेहरे, पोलिस निरीक्षक महेश मसराम, पोलिस उप निरीक्षक ज्ञानेश्वर लांडे सुजाता भोपळे सोनम नाईक प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान हटविण्यात आलेल्या अतिक्रमणानंतर अतिक्रमण धारकांनी पुन्हा जैसे थे बांधकाम केल्यास त्या बांधकामांची मोजणी करून मंजूर नकाशा नुसार बांधकाम ठेवून अतिरिक्त बांधकाम पाडण्यात येईल असे मुख्याधिकारी विजय कुमार आश्रमा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर कारवाई होणार
साकोली-वडसा -आरमोरी ३५३ ही या राष्ट्रीय महामार्गालगत देसाईगंज शहरातील मुख्य रस्त्यावरील अस्थायी पट्टेधारकांसह लहान मोठे अतिक्रमण धारकांना अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत सुचनेतील राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण ( भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ मधील नियम २६ ची उपकलम (२) च्या अधीन राहून उप विभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी ता २० मे ला नोटीस क्र Q /रा. म. ३५३ ही/वडसा/अतिक्रमण/२०२२ नुसार नोटीस बजावल्या नंतर अतिक्रमण धारक चांगलेच धास्तावले आहेत. तथापि राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी काल पासून डेरेदाखल झाले असल्याने राष्ट्रीय महामार्गावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत़.