
गोंदिया-भाजप शिक्षक आघाडी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यात सहविचार सभेचे आयोजन २७ मे रोजी करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी कादर शेख होते. सभेत शिक्षकांच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
सभेत सेवाज्येष्ठता यादी, दुय्यम सेवा पुस्तक, मासिक वेतन पावती, निवडश्रेणी देयके भानिनि अंतिम परतावा ३0 जूनचे वेतनवाढ यासह अन्य समस्यांचा समावेश होता. सभेत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या महागाई भत्त्याची प्रलंबित थकबाकी व ७ व्या वेतन आयोगाचा तिसर्या हप्त्याची मागणी करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकार्यांनी वेतन पथक कार्यालयातील कर्मचार्यांची शिक्षकांशी अपमानजनक वागणूक व मुद्दाम भ्रष्टाचारास वाव मिळेल म्हणून शिक्षकांची कामे प्रलंबित ठेवण्याचा प्रश्न उचलून धरला. तेव्हा शिक्षणाधिकार्यांनी वेतन पथकाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. व गरज भासल्यास वेतन पथकातील कर्मचारी हटवून नविन कर्मचारी नेमण्याचे आश्वासन शिक्षकांना दिले. सभेला भाजप शिक्षक आघाडीचे पदाधिकारी अरूण पारधी, लिलेश्वर बोरकर, सतीष मंत्री, चरणदास डाहारे, मधुकर कुरसुंगे, मनोज येळे, मुन्नालाल कटरे, हरीष पटले, सुरेश परशुरामकर, दुधराम राऊत, उदेलाल हनवते, रामदास वंजारी यांच्यासह वेतन पथकाचे वाकडे, रामटेके उपस्थित होते.