आमदार रहांगडाले यांच्या हस्ते ८२ लाख रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन

0
43

तिरोडा,दि.01:– तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते सरांडी जि.प.अंतर्गत खोपडा येथे मातोश्री पांदन रस्ता योजनेअंतर्गत रस्ता बांधकाम २५.०० लक्ष, आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत इसापूर येथे चावडी बांधकाम ३.०० लक्ष, खोपडा येथे चावडी बांधकाम ३.०० लक्ष, केसलवाडा येथे विशेष दलित वस्ती अंतर्गत सिमेंट नाली बांधकाम १०.०० लक्ष, मनरेगा अंतर्गत सिमेंट रस्ता २०.०० लक्ष,ग्रामविकास निधी अंतर्गत सिमेंट रस्ता ५.०० लक्ष, आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत चावडी बांधकाम ३.०० लक्ष, येडमाकोट येथे मनरेगा अंतर्गत रस्ता खडीकरण ८.०० लक्ष, आमदार स्थानिक निधी अंतर्गत सभामंडप ५.०० लक्ष असे एकूण ८२.०० लक्ष मंजूर कामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी प्रामुख्याने तिरोडा पंचायत समिती सभापती कुंता रामप्रकाश पटले,जि.प.सदस्या रजनी कुंभरे, प.स.सदस्या प्रमिला भलाई,वनिता भांडारकर,भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रवींद्र वहिले, सरपंच अनिता कुकडे,सरपंचा निशा बावनकर,सरपंच राजू कापसे, सेवा सह.अध्यक्ष उत्तम कुकडे,ग्रा.प.उपसरपंच सोनू भांडारकर,ग्रा.प.सदस्य शिवशंकर मलेवार, अनिता पिपरहेटे, कुंदा फटे ओमप्रकाश भेलावे, भाजप सा.न्याय मंत्री रोहित शहारे, शिवशंकर शेंडे,संतोष बावनकर,तालुका महामंत्री रामप्रकाश पटले, जितेंद्र भलाई व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.