काँग्रेसच्या निवडणुकासंबधी 3 जून रोजी गोंदियात सभा

0
98

गोंदिया,दि.01ः- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात काँग्रेसच्या विविध आघाड्यांच्या निवडणुकांचे नियोजन करण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्ह्याचे निवडणुक प्रभारी विजयजी चोपडा (DRO) व जिल्हा प्रभारी आमदार अभिजित वंजारी तसेच आमदार सहेसराम कोरोटे यांच्या उपस्थितीत BRO व काँग्रेस पक्षाची सभा” दिनांक ०३/०६/२०२२ रोज शुक्रवारला, सकाळी ११.३० वाजता, भोला भवन गोंदिया, येथे आयोजित करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, गोंदिया जिल्हा अंतर्गत येण्यार्‍या सर्व तालुकांच्या संघटनात्मक निवडणुका घेण्यासंबंधी ही सभा आयोजित केली असून जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व तालुका अध्यक्ष तसेच इतर संघटना पदाधिकार्‍यांनी (महिला, युवा, सेल, फ्रंटल, आघाडी, विभाग, डिजिटल विभाग)कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केले आहे.