33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जि.प. सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांच्या तर्फे पंखे भेट

जि.प. सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांच्या तर्फे पंखे भेट

0
72

blank

गोरेगांव :  मुंंडीपार येथील महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद)च्या महिलांना जि.प. सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या तर्फे दोन सिलिंग फॅन (विद्युत पंखे) देणगी म्हणून भेट स्वरुपात देण्यात आले.
महाराष्ट्रात प्रत्येक गावात उमेदच्या माध्यमातुन महिला सबलीकरण साठी महिला बचत गट तयार करण्यात आले आहेत.सदर उमेदच्या मिंटींग हाल मध्ये उन्हाळ्यात तापमान जास्त प्रमाणात असल्यामुळें बचत गटाच्या महिलांना बसण्यासाठी गैरसोय होत होती हे ओळखुन जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांनी दोन सिलींग पंखे ग्रामसंघ अध्यक्ष माधुरी बोमले व पदाधिकारी याच्या सुपुर्द केले.
या कार्यक्रमाला सरपंच सुमेंद्र धमगाये, उपसरपंच जावेद (राजाभाई)खान, तंमुस अध्यक्ष गिरिश पारधी,माजी तंमुस अध्यक्ष नामदेव नेवारे,माजी तंमुस अध्यक्ष घनश्याम बिसेन, माजी से.सह.संस्था अध्यक्ष पंढरी कटरे, वन व्यवस्थापन अध्यक्ष टुकेंद्र भगत, ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर सामाजिक कार्यकर्ते गेवेंद्र भगत,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बिसेन,ग्रामसंघ अध्यक्ष माधुरी बोमले,ग्रामसंघ कोषाध्यक्ष पुजा पारधी,सीआरपी शिला चौधरी,ग्रा.पं.सदस्य भुमिता भगत,ग्रा.पं.सदस्य छाया चौधरी,ग्रा.पं.सदस्य छाया बिसेन, कृषीसखी ज्योती ठाकुर व उमेदच्या महिला सदस्य आदी उपस्थित होते.
ग्रामसंघ अध्यक्ष माधुरी बोमले यांनी जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांचे उमेद तर्फे आभार मानले.

blank