तिरोडा – येथील पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारला पंचायत समिती सभापती सौ.कुंदा रामप्रकाश पटले यांच्या हस्ते स्वराज्याची गुढी उभारण्यात आली. अध्यक्षस्थानी उपसभापती हुपराज जमईवार, या प्रंसगी जिल्हा परिषद सदस्य चतुरभुज बिसेन पंचायत समिती सदस्य चैतलाल भगत ,जयप्रकाश पटले,सौ.ज्योती शरनागत, प्रमिला भलाई, दिपाली टेभेक़र,वनिता भांडारकर,सौ,सुनंदा पटले,रिता पटले,विजय बिंझाडे,कविता सोनेवाने, जितेंद्र चौधरी, तेजराम चौव्हाण, विस्तार अधिकारी शितेश पटले,अनुप भावे,धारकर,आरोग्य विस्तार अधिकारी गौतम, सौ.चौधरी, लेखापाल गाडवे,सर्व अधिकारी, सर्व विभागाचे कनिष्ठ अभियंता,सर्व कर्मचारी उपस्थित होते. सर्व प्रथम पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज च्या प्रतिमेचेपुजन करून गुढी उभारण्यात आली. तदनंतर राष्ट्रीयगीत गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनचरित्र्यावर प्रकाश टाकण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजानी केलेल्या राज्यकारभार १७ व्या शतकात या महाराष्ट्रात भुमिपुत्राचे हिदंवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले. जुलमी राजवंट संपुष्टात आणण्यासाठी सर्व जाती धर्माच्या अठरापगड, बारा बलुतेदार व जीवाभावाचे मावळे याना एकत्र करून हा लढा दिला जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला. राष्टनिर्माता असलेल्या शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस उगवला तो म्हणजे,६ जुन १६७४ ला महाराजाचा राज्यभिर्षेक झाला. ते शिवाजी महाराजाचे छत्रपती झाले हा दिवस म्हणजे शिवस्वराज्य दिन म्हणून पाळण्यात आला .संचालन विस्तार अधिकारी धारगावे यांनी केले आभार अनुप भावे यांनी मांनले.