एस. चंद्रा महिला महाविद्यालय आमगाव येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात

0
16

आमगाव– स्थानिक एस. चंद्रा महिला महाविद्यालय आमगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे ६ जून रोजी “शिवराज्यभिषेक दिन” निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य  डॉ. तृष्णा कळंबे तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ अजय मून, विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. प्रणाली मेश्राम व कु नेहा ठाकरे उपस्थित होते.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तृष्णा कळंबे यांनी आपल्या मार्गदर्शनात उपस्थिताना “शिवराज्यभिषेक दिनाच्या”  शुभेच्छा देत शिवराज्यभिषेक दिनाचे महत्व समजावून संगतीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ अजय मून यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. तसेच शिवराज्यभिषेक दिना बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन बी.ए. प्रथम वर्षाची विध्यार्थिनी अंजू वैरागडे व आभार प्रदर्शन बी.एस.सी. प्रथम वर्षाची विध्यार्थिनी  मनीषा लिल्हारे  यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी मोठ्या संखेत उपस्थित होत्या.