गोंदिया- जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार वितरीत केला जात असल्याच्या अनेक तक्रारी असल्याने चक्क शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख यांनी शाळांना भेटी देऊन चक्क पोषण आहाराची तपासणी करून पोषण आहार योग्य की अयोग्य याची खात्री करून घेतली.
सध्या शाळा बंद आहेत. मात्र शाळेत पोषण आहाराचासाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शाळा उघडल्यानंतर पोषण आहाराची गुणवत्ता कशी आहे हे पाहणे गरजेचे असल्याने दिनांक ७ जून रोजी गोरेगांव तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सटवा येथे भेट देऊन प्रत्यक्ष पोषण आहाराची तपासणी केली. दिनांक ८ जून रोजी गोरेगांव तालुक्यातील बबई, आमगाव तालुक्यातील सोनेखरी तसेच ९ जून रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पवनी धाबे येथील शाळांना शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी भेटी देऊन पोषण आहाराची तपासणी करून आहार योग्य असल्याची खात्री करून घेतली.