आटपाडी दि.१०-जिल्हा परिषद, पंचायत समिती, आटपाडी नगर पंचायत आणि दिघंची सह विविध गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीत नेत्रदीपक यश मिळवून आटपाडी तालुका राष्ट्रवादीमय करण्याचा निर्धार यावेळी बोलुन दाखविण्यात आला .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . राष्ट्रवादीच्या ध्वजाला वंदन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब ना . जयंतराव पाटील साहेबांच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या .
यावेळी पक्षाचे वतीने ज्येष्ट नागरीक इसाक मुल्ला कंडक्टर, व्ही एन देशमुख , अरविंद चांडवले, सुखदेव चव्हाण, महादेव लांडगे ड्रायव्हर यांचा यावेळी शाल घालुन सन्मान करणेत आला .
काही दिवसांवर येवून ठेपलेल्या जि .प . पं. स . च्या मार्केट कमिटी व इतर निवडणूका सामुदायीक शक्तीने आपण सामोरे गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णायक स्थितीतले लक्षवेधी यश मिळवेल असे स्पष्ट करून आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या .
माझी आणि जयंतराव पाटील यांची निवडणूका संदर्भात चर्चा झाली आहे . भविष्यात त्याप्रमाणे पावले टाकली जातील . जयंतराव पाटील राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहीजेत अशी मी पक्षाकडे प्रार्थना करतो अशा भावना ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील यांनी व्यक्त केल्या .
विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता संपर्क अभियान राबविल्यास पक्षाला हा प्रयत्न पोषक ठरेल . प्रत्येक निवडणुकीत लक्षवेधी यश मिळविल्यास सत्तेचा सारीपाठ फिरविण्यात राष्ट्रवादीच निर्णायक भूमिका वटवेल . त्यादृष्टीने सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करू या. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी करून सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आभार मानले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आनंदरावबापु पाटील, ज्येष्ट नेते विष्णुपंत पाटील, विलासराव नांगरे पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनिताताई पाटील, तालुका अध्यक्षा सौ. अश्विनीताई कासार, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, तालुक्याचे युवा नेते सौरभभैय्या पाटील, प्रा .संताजी देशमुख, जालिंदर कटरे, दत्ता यमगर, किशोर गायकवाड , समाधान भोसले, रणजित चव्हाण, राजेंद्र सावंत, सौ .आशाताई देशमुख, सौ .उज्वलाताई सरतापे, वैशाली वाघमारे, रविंद्र लांडगे, लालासाहेब भिसे, संभाजी जाधव, विशाल चव्हाण, अजित गुरव, निलेश जरे, सोमनाथ लोहार, बिरा सोन्नुर, विनायक शेंडगे, शरद सोन्नुर, धुळाजी ठेंगले, महादेव देवकर, सर, अक्षय मोरे इत्यादी अनेक जण उपस्थित होते .