गोंदिया,दि.13- चौध्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याने एकोडी जिल्हापरिषद क्षेत्रांतर्गत गंगाझरी येथे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा भव्य नागरी सत्कार गेल्या 11 तारखेला करण्यात आला.
यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजु कारेमोरे, माजी जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे, युनुस शेख,पंचायत समिति सदस्य शंकर टेंभरे, माजी पंचायत समिति सदस्य प्रकाश पटले, नागोराव लिचडे, मोनु पठाण, हितेश फताये, सोनु घरडे, गोविंद लिचडे, रंजित टेंभरे ,आरिफ़ पठाण, दिपक रिणायत, हिरा तुमडाम, द्वारका साठवने, लंकेश पटले, भरत परिहार, धर्मेन्द्र कनोजे, राजेशकुमार तायवाडे उपस्थित होते.
एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य अश्विनी रविकुमार पटले, गंगाझरी पंचायत समिति सदस्या वंदना प्रकाश पटले रविकांत बोपचे सामाजिक कार्यकर्ते राजेश कटरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन खासदार प्रफुल्ल पटेलांचा सत्कार केला
सत्काराला उत्तर देताना श्री पटेल म्हणाले की, गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर राहिलो आणि आहे. मागील 32 वर्षात चारवेळा लोकांमुळे व चारवेळा लोकांशिवाय संसदेत गेलो. लोक चुका करतात. त्यामुळे मी माझा मार्ग स्वतः तयार करतो. मात्र, ही चांगली बाब आहे किंवा नाही, हे आपल्याला ठरवायचे आहे. जे काही असेल त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो. आम्ही सर्व एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच काम करीत आहोत व काम करीत राहू. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, एकोडी जिल्हा परिषदेचे माझे नेहमीच प्रेम राहिले आहे. नेहमीच असे प्रेम संबंध बनवून ठेवा, असेही ते म्हणाले.