पोलिस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रवीण कोचे

0
21
 कार्याध्यक्षपदी संजय हत्तीमारे यांची निवड

गोंदिया,दि.13- महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलिस पाटील संघटना गोंदिया जिल्हयाची सभा शासकिय विश्राम गृह गोंदिया येथे  काल  १२ तारखेला आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी प्रवीण कोचे तर जिल्हा सचिवपदी संजय हत्तीमारे यांची बहुमताने निवड करण्यात आली 

 या सभेच्या अध्यक्षस्थानी मोहनसिंह बघेल हे होते. यासभेत निवर्तमान अध्यक्ष अध्यक्ष मोहनसिंह बघेल यांना संघटनेच्या वतीने शाल व श्रिफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. यामध्ये
अध्यक्षपदी प्रविण कोचे, कार्याध्यक्षपदी संजय हत्तीमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी साहेबराव बंसोड, प्रदीप बावनथडे,  लक्ष्मीकांत कोल्हे, कोषाध्यक्ष मनोजकुमार बडोले, सहकोषाध्यक्ष राहुल बोरकर, प्रचार प्रमुख निलेश तुरकर, सह. प्रचार प्रमुख डॉ. शाम नागपुरे, संघटक सुभाष अंबादे, सहसंघटक राजु कडव,
प्रमुख मार्गदर्शक म्हणुन  कुन्जिलाल भगत व मोहनसिंह बघेल यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा महिला प्रतिनिधी उषा बोपचे, इंदिरा चौधरी, ईन्दुमती राहांगडाले, हेमेश्वरी चौधरी, प्रतिभा कोरोंडे, बबिता शेन्डे, मंगला तिडके, पुस्तकला चौरे, विश्वेश्वरी कुर्वे, शितल मेश्राम, सुर्यकांता बिसेन, वैशाली उईके, पुरूष जिल्हा प्रतिनिधी म्हणून हिवराज ताजने, सुरेश कोरे, तिर्थराज पटले, उमेशकुमार बावनकर, पुरुषोत्तम बहेकार, के. डी. साखरे, राजेंद्र धमगाये, देवेन्द्र नागपुरे, अरविंद चौरे, हितेश सोनवाने, प्रकाश मेश्राम, संतोष बहेकार, भिमराव साखरे, चंद्रकुमार हुकरे, लोकचंद बिजेवार, आनंदराव शिवणकर, देवेंद्र रामटेके, विजय कापसे व अन्य पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना संघटनेकडुन पाच हजार पाचशे रू. ची आर्थिक सहायता वर्गणी करून देण्यात आले.
या बैठकीमध्ये अनिरुद्ध तांडेकर, विनोद नंदेश्वर, प्रतिभा ठाकरे, प्रकाश पारधी, मंगेश नागभिरे, गोविंदराव येटरे, ओमप्रकाश लाडे, महेश सहारे, मनमोहन श्रीवास, तेजलाल पटले, किशोर दोनोडे, गिरधारी रहिले, अशोक भांडारकर, मुकेश ब्रम्हवंशी, विनायक राखडे, क्रांती बिसेन, मुकेश पाचे, व अन्य पोलीस पाटील हजर होते.
याप्रसंगी नविन पदाधिकाऱ्यांसह सर्व नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
सभेचे संचालन संघटनेचे जिल्हा सचिव श्री मनोहरसिंह चौहान यांनी तर आभार प्रदर्शन संघटनेचे उपाध्यक्ष साहेबराव बंसोड यांनी केले.