तिरोडा,दि.14ः- गोंदिया स्पोर्टस अँड कराटे डो एसोसिएशन द्वारा आयोजित आमदार चषक कराटे स्पर्धेतील काता व कुमिते या प्रकारात 14 वर्ष वयोगटात अंजली प्रमोदकुमार बघेले हिने प्रथम येत सुर्वण पदक पटकावला.या स्पर्धेत नागपूर,भंडारा,तुमसर,तिरोडा व गोंदिया येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. अंजलीचा आमदार विजय रहांगडाले यांचे हस्ते गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सेंसई राजेंद्र पिल्लई ,राज्य क्रिडा मार्गदर्शक नाजूक उईके तसेच तिरोडा येथील गणमान्य नागरिक व दिडशेच्यावर खेळाडू आणि स्पर्धेचे आयोजक सुनील शेंडे व संजय नागपूरे उपस्थित होते .या विजयाबद्दल जिल्हा क्रिडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी शुभेच्छा दिल्या.अंजली ने आपल्या यशाचे श्रेय जिल्हा कराटे एसोसिएनचे अध्यक्ष विशालसिंग ठाकूर व सेंसई रविना बरेले व आपल्या आईवडील यांना दिले.