केंद्र सरकारने धान खरेदीची मर्यादा वाढवावी

0
31

*राष्ट्रवादी काँग्रेस सडक अर्जुनी तर्फे तहसीलदार निवेदन

सडक अर्जुनी ::–सन 2021-22 या रब्बी हंगामामध्ये धान खरेदी सुरु करण्यात आली. 9 लक्ष 12 हजार क्वींटल खरेदीवर केंद्र शासना कडून एवढीच परवानगी असल्याचे सांगून धान खरेदी बंद करण्यात आली. या वर्षी 17 क्वींटल खरेदी चे परवानगी कृषी विभागा मार्फत देण्यात आली. उपरोक्त खरेदी प्रमाणे फक्त 35 टक्के शेतकऱ्याची खरेदी झाली 65 टक्के शेतकऱ्याचे धान अजूनही शेतात किंवा घरीच पडलेले आहेत, त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामा करिता शेतकऱ्यांजवळ खते -बियाणे व इतर शेतीची साधने घेण्या करिता पैसा नाही.
सुरवातीला केंद्र सरकारची 4 लक्ष 79 क्वींटल मर्यादा होती ,नंतर राष्ट्रवादी ने वारंवार मोर्चे काढले त्याची दखल घेत 9लक्ष 12 हजार क्वींटल एवढी वाढ केली ,शेतकऱ्यांनी आँनलाईन केलेल्या आकडेवारी नुसार 32 लक्ष क्वींटल ते 33लक्ष क्वींटल पर्यंत शासकीय धान खरेदी ची मर्यादा केंद्र सरकारने द्यावी , या करिता सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून तहसीलदार बागडे सडक अर्जुनी यांना निवेदन देऊन ते निवेदन पतप्रधान नरेंद्रजी मोदी व केंद्र सरकारला पाठवण्यात आले. या निवेदनाची दखल न घेतल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अविनाश काशिवार, रमेश चुऱ्हे माजी जि. प.सदस्य, तेजराम मंडावी नगर पचायायत नगराध्यक्ष, वदना डोगरवार उपनगराध्यक्ष, रुकीराम वाढई, उमराव मांढरे, शिवाजी गहाणे, हेतराम खोटेले, रजनी गिऱ्हेपुंजे महिला तालुका अध्यक्ष, मुनिश्वर कापगते, सुभाष कापगते, आनंदकुमार अग्रवाल, दिलीप गभने, कामिनी कोवे, प्रमोद लांजेवार ,भागवत झिंगरे, श्रीराम झिंगरे, सुखदेव कोरे, मोतीराम कापगते, अमीन शेख, हेमराज खोटेले,धनराज भेंडारकर, देवचन टेंभुर्णे, प्रमिला मटाले व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.