उमेदवारांना वयोर्मयादेत कितीही वेळा परीक्षा देता येणार

0
21

वृत्तसंस्था/मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या उमेदवारांना वयोर्मयादेत कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. संधीची र्मयादा आता एमपीएसीकडून हटवण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचा मार्ग सुकर झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धा परीक्षांना बसणार्‍या उमेदवारांचे प्रयत्न, संधींची संख्या र्मयादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती एमपीएससीच्या ट्विटवरून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरचे एक मोठे कोडे आता सुटले आहे. आधी संधींच्या र्मयादेमुळे अनेकांना आपल्या ध्येयापासून मुकावे लागत होते. मात्र आता तसे प्रकार घडणार नाहीत.
आधी संधींच्या र्मयादा असल्यामुळे दिलेल्या संधींमध्येच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळत होती. त्यामुळे अनेकांना र्मयादा संपल्यावर परीक्षा देत येत नव्हती. त्यानंतर इच्छा नसतानाही इतर पर्यायी मार्गांचा स्वीकार करावा लागत असे, आता मात्र तसे होणार नाही. काही वेळेस अपयश आले तरी वयोर्मयादा आहे तोपयर्ंत पुन्हा पुन्हा परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ही बातमी स्पर्धापरीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांचा उत्साह नक्कीच वाढवणारी आहे. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडूनही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाकाळात इतर विद्यार्थ्यांसोबतच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेकवेळा एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे अनेकांना वयोर्मयादेमुळेही परीक्षा देता आल्या नव्हत्या. तर अनेक विद्यार्थ्यांच्या नियुक्त्याही रखडल्या होत्या. त्यासाठी अनेकदा एसपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचेही दिसून आले आहे. आता गेल्या दोन वर्षातील उमेदवारांचे नुकसान भरून काढण्यासाठी एमपीएससी आयोगाकडून तातडीने पाऊले उचलली जात आहेत.